Exploring Aihole's Architectural Marvels | Full Guided Tour | journey to miles | #aihole
Aihole :- हे कर्नाटक, भारतातील प्राचीन आणि मध्ययुगीन बौद्ध , हिंदू आणि जैन स्मारकांचे ऐतिहासिक ठिकाण आहे जे सहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंतचे आहे. शंभरहून अधिक ऐहोल मंदिरे हिंदू आहेत , साइटवरील बहुतेक जिवंत स्मारके ७व्या ते १०व्या शतकातील आहेत. [शेतजमिनी आणि वाळूच्या टेकड्यांनी वेढलेल्या एका नामांकित लहान गावाभोवती वसलेले, आयहोल हे बागलाकोट जिल्ह्यातील मालाप्रभा नदीच्या खोऱ्यात पसरलेले एकशे वीस दगड आणि गुहा मंदिरे असलेले एक प्रमुख पुरातत्व स्थळ आहेतर आपण जाणून घेऊयात ह्या संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओ व्दारे..
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- Music Credit :- Channel name : Ncv-No Copyright Vibes music link :- https://youtu.be/yb2C_IejFqQ?si=Ua4HNxjI9-z8iBm-
Timecodes
0:00 - Intro
05:30 - Stay Information
12:32 - vlog ..
The Red Roof Eco Stay
Contact No - 99674 73067
Website Link - https://theredroofecostay.com/
Q .Why Choose The Red Roof - Eco Stay ?
Ans :-
By choosing Eco Stay, you are making a conscious decision to travel sustainably and reduce your carbon footprint. You will be supporting local communities and businesses, while preserving the natural environment for future generations. Our team is dedicated to providing exceptional service and ensuring that your travels are both unforgettable and environmentally responsible.
So whether you are looking for a relaxing stay in the nature including outdoor activities, Swimming Pool, Authentic testy food, and some private space, The Red Roof – Eco Stay has you covered. Let us help you plan your next eco-friendly getaway!
...
https://www.youtube.com/watch?v=v6imIF8HvS8
कोर्लई : -
कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीवर रेवदंडा येथे साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडीमार्गाने जोडले गेले आहेत. कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला रेवदांड्याचा किल्ला आहे. तर दक्षिणेकडे कोर्लई गावाजवळ कोर्लईचा किल्ला आहे.
मोक्याच्या जागी असलेल्या या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोरलईपासून वसई पर्यंतच्या आपल्या प्रांताच्या रक्षण केले. पोर्तुगीज व्यापाराचा पुरावा कोर्रलई खेड्यांच्या रहिवाशांच्या लुसो-इंडियन पोर्तुगीज क्रिओल या वेगळ्या बोलीमध्ये दिसून येतो.
कोरलाई गाव हे अलिबाग - मुरुड या गाडी रस्त्यावर अलिबाग पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. कोर्लईला रोह्याकडूनही येणारा गाडीरस्ता आहे. रोहा ते मुरुड (चणेरे मार्गे) हा गाडी रस्ताही कोर्लई गावाजवळून जातो.
इतिहास
इ.स. १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांनी चौल या रेवदंडा जवळच्या खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या भागात काम सुरू केले. त्यांनी कोर्लईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमेली कॅरेरी यांनी चर्चिल चौथा या पुस्तकात नमूद केले आहे की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगीजांना ३०० पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. १३ सप्टेंबर इ.स. १५९४च्या अहमदनगर निजामशहा व पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या लढाईनंतर किल्ला पोर्तुगीजांकडे आला.
------------------------------------------------------------
Music Credit : -
Infraction - No Copyright Music
https://youtu.be/A4ZOu1iWGo4
Vlog No Copyright Music
https://youtu.be/PbcfSOhkzYw
...
https://www.youtube.com/watch?v=ucmpN2heYoo
#raigadfort #chatrapatishivajimaharaj #maharashtra
राजांचा गड - रायगड
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या शतकात] याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.
Raigad Guide :
Satish dada : 93737 98915
Music by Rights Free Sound
Track name : Historical
Watch: https://youtu.be/xky6k3CypKc
Stream / Download : https://hypeddit.com/link/mhbhw7
...
https://www.youtube.com/watch?v=9MhCQrXZZuU
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :-
श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.दरवाजाची कमान बऱ्यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्यांच्या देवडा आहेत. किल्ल्यावर माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेष आहे. गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरी तटबंदिचा म्हणजेच चिलखती बुरज आहेत. गडाच्या माथ्यावरून लोहगड , तुंग, मोरगिरी , कोरीगड , घनगड, बहिरान पठार , खंडाळा, सोनगिरी, माथेरान , ढाक हा परिसर दिसतो.
लोणावळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येताना वाटेतच गडाच्या वेशीजवळ एक वीरशिल्प व स्मृतीशिळादिसते. जवळच तटबंदीचे व बुरुजांचे अवशेष तसेच गणपति आणि मारुतीचे लहान मंदिर आहे. तेथून पुढे मार्ग श्रीवर्धनगडाला वळसा घालून किल्ल्याच्या माचीवरील 'उधेवाडी' गावात येतो. गावात मारुतीचे मंदिर आहे. गावाच्या उत्तरेस असलेल्या खिडकीच्या वाटेने कोकणात कोंढाणे लेणी कडे उतरता येते. उधेवाडीच्या दक्षिणेस देवराई असून पलिकडे महादेवाचे जूने मंदिर व उदयसागर तलाव आहे. ह्या तलावावर एक शिलालेख असून तलावाशेजारी चुणा मळण्याचा घाणा व दगडी चाक आहे. महादेव मंदिरामागील पठारावर काही स्मृतीशिळा आहेत. पश्चिमे दिशेला कोकण दरवाजाचे अवशेष आहेत. श्रीवर्धन व मनरंजन ह्या दोन्ही दुर्गांच्या मधील खिंडीत भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिरापुढे दीपस्तंभ व काही मुर्त्या आहेत. मंदिरा समोरून श्रीवर्धनगडावर तर मंदिरामागून मनरंजनगडावर वाट जाते.
मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. या किल्ल्याला दोन दरवाजे असून दोनहक दरवाजे समोरील तटबंदीमुळे लगेच दिसून येत नाहीत. मनरंजनच्या माथ्यावर छत नसलेली एक वास्तू, एक मोठा तलाव व काही इमारतींचे अवशेष आहेत. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे व तीन चार मोठे बुरुज ह्ता तटात आहेत. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाक, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.
Music Credit :-
https://youtu.be/gmgL9oe0U2I
...
https://www.youtube.com/watch?v=3g8wIbZ601o
पन्हाळेकाजी लेणी :-
रत्नागिरी जिल्यातील दापोली तालुक्यात पन्हाळेकाजी येथे पुरातन लेणी आहेत. प्रणालक दुर्गाच्या दक्षिण भागात गौर लेणे असा एक भाग आहे.या लेणीसमूहात गणपती, त्रिपुरसुन्दरी , सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.अक्षोभयाची एक डोकेविरहीत मूर्ती येथे पहायला मिळते.शिवलिंग, गाभा-याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग,रामायण-महाभारतातील प्रसंगएका लेण्यात पहायला मिळतात. मानुषी बुद्ध,भैरव, हनुमान यांची शिल्पेही वेगवेगळ्या लेण्यात पहायला मिळतात.
हा लेणीसमुह खोदण्याची सुरुवात दुस-या किंवा तिस-या शतकापासून झाली. त्या ८ ते ११ शतकांपर्यंत खोदल्या गेलेल्या आहेत.
...
https://www.youtube.com/watch?v=tGTWA3ODkR4